उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अभिनंदन

    11-Sep-2025
Total Views |
 
 

VP 
राज्याचे विद्यमान राज्यपाल आणि राष्ट्रीय लाेकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ‘राधाकृष्णन यांचे जीवन सेवा, समर्पण आणि राष्ट्रहिताप्रती निष्ठेचे प्रतीक आहे. शिक्षण, सामाजिक उत्थान आणि सुशासनातील याेगदान प्रेरणादायी आहे.आपल्या अनुभव आणि दूरदृष्टीमुळे भारत नवी उंची गाठेल आणि जागतिक स्तरावर सश्नत स्थान प्राप्त करेल. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आपले मार्गदर्शन अमूल्य आहे,’ असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. समर्पण व विनम्र नेतृत्वाचा हा सन्मान आहे. विकासाची गंगा सामान्यांपर्यंत पाेहाेचवण्याचे त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे, असे शिंदे यांनी सांगितले.त्यांच्या अनुभवाचा देशाच्या लाेकशाही आणि संविधानिक मूल्यांच्या सक्षमीकरणासाठी लाभ हाेईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्य्नत केला आहे.