वाच्यार्थ : मूर्खपणा नेहमीच त्रासदायक असताे आणि युवावस्थादेखील तापदायक असते; पण सर्व प्रकारच्या दु:खांपेक्षा जास्त त्रासदायक असते ते दुसऱ्याच्या घरी राहावे लागणे.
भावार्थ : जीवनात काही गाेष्टी अत्यंत ्नलेशदायक ठरतात.
1. मूर्खता - मूर्ख व्य्नतीला बरं-वाईट कळत नाही.नित्याचे व्यवहार नीट जमत नाहीत. लाेक त्याची फसवणूक करतात, त्याला हसतात. काम बिघडले तर बाेचरे शब्द ऐकावे लागतात. त्यामुळे मन अतिशय दु:खी हाेते व चारित्र्यहनन हाेते आणि त्यामुळे आणखी चुका हाेतात.
2. युवावस्था - युवावस्था म्हणजे उधाण आलेला सागर किंवा बेभान अवस्था हाेय.