ऑक्टाेबर 24 ते जुलै 2025 यादरम्यान महारेराने घर खरेदीदार ग्राहकांच्या विविध 5267 तक्रारी निकाली काढल्या आहेत. जुलै अखेरपर्यंत दाखल झालेल्या घर खरेदीदारांच्या तक्रारींची पहिली सुनावणीही झाली किंवा त्यातल्या काहींच्या सुनावणीसाठीच्या तारखाही निश्चित करण्यात आल्या आहेत.घर खरेदीदार आयुष्याची कमाई गुंतवून घर नाेंदवताे; परंतु काही कारणाने वेळेत ताबा मिळालानाही. गुणवत्ता, घर खरेदी करारात मान्य केलेल्या साेयी सवलती आणि इतरही काही बाबी नाहीत, अशा स्वरूपाच्या अडचणींना त्यांना सामाेरे जावे लागते. या घर खरेदीदारांच्या हिताचे रक्षण करण्याची जबाबदारी महारेराची आहे. त्यामुळेमहारेराकडे नाेंदवल्या जाणाऱ्या तक्रारींची नाेंद वेळच्या वेळी घेतली जावी.न्याय्य दिलासा दिला जावा.यासाठी महारेराचे अध्यक्ष मनाेज सैनिक व त्यांचे सहकारी महारेरा सदस्य महेश पाठक व रवींद्र देशपांडे यांनी तक्रारींबाबत सुनावण्यांची गती वाढवण्याचे नियाेजन केले.त्यांच्या या नियाेजनाला यश येऊन प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली निघाली.