जायकवाडीत दाेन नवे पंप कार्यान्वित दिवाळीनंतर वाढीव पाणी मिळणार

    11-Sep-2025
Total Views |
 

Pump 
 
छत्रपती संभाजीनगरला डिसेंबरपासून राेज पाणी द्यावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली हाेती. त्यानुसार जीवन प्राधिकरणाने नवीन पाणीपुरवठा याेजनेला गती दिली.जायकवाडीत मागील 13 दिवसांपासून पाणीउपसा करणारे 3700 अश्वश्नतीचे दाेन माेठे पंप बसवण्याचे काम सुरू हाेते.हे दाेन्ही पंप यशस्वीरित्या बसवण्यात यश आले. नियाेजित वेळापत्रकानुसार सर्व कामे पूर्ण झाल्यास दिवाळीनंतरच शहराला वाढीव 200 एमएलडी पाणी मिळू शकते.सध्या शहराला 26 एमएलडी वाढीव पाणी मिळते. नवीन पाणीपुरवठा याेजनेचा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले हाेते. त्यानंतर पाणीपुरवठा याेजनेच्या कामाने चांगलीच गती घेतली आहे.जायकवाडी धरणातून राेज 200 एमएलडी पाणी उपसण्यासाठी 3700 अश्वश्नतीचे दाेन पंप बसवण्याचे काम नुकतेच पूर्ण झाल्याचे जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी सांगितले. या पंपांवर आता स्लॅब टाकण्यात येणार आहे. 15 ऑक्टाेबरपर्यंत माेटार बसवण्याचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. दिवाळीच्या सुमारास 200 एमएलडी पाण्याची चाचणी सुरू करण्याचा प्रयत्न असेल, असेही सांगण्यात आले.