मुंबईत सुरू हाेणार नवीन वैद्यकीय महाविद्यालय

    11-Sep-2025
Total Views |
 

Medical 
 
गेल्या वर्षी राज्यात 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आल्यानंतर यंदा मुंबईत आणखी एक नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू हाेणार आहे. राज्य कामगार विमा याेजनेच्या (ईएसआयसी) अंधेरीतील रुग्णालयात हे नवीन महाविद्यालय सुरू हाेणार आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयाेगाने या महाविद्यालयासाठी परवानगी दिली असून, 2025-26 या शैक्षणिक वर्षात 50 जागांची मंजुरी दिली आहे. त्यामुळे यंदा मुंबईत आणखी एका महाविद्यालयाची भर पडणार आहे. त्याचप्रमाणे या शैक्षणिक वर्षात आयाेगाने राज्यातील अभिमत विद्यापीठांमध्ये 300 जागांना मान्यता दिल्याने यंदा राज्यात 350 नव्या जागांची भर पडणार आहे. या जागांचा समावेश अखिल भारतीय काेट्यात हाेणार असून, 5 सप्टेंबरपासून दुसऱ्या फेरीला सुरुवात हाेणार आहे.मुंबईत नव्याने मान्यता मिळालेल्या अंधेरीतील ईएसआयसी रुग्णालयात 50 जागांना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे मुंबईत आणखी एका नवीन वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग माेकळा झाला आहे.
 
अंधेरीतील या महाविद्यालयातील 15 ट्नके म्हणजे आठ जागा या अखिल भारतीय काेट्यासाठी, तर 20 ते 30 ट्नके जागा ईएसआयसीमधील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी राखीव असणार आहेत.त्यामुळे यातील निम्म्या जागा या सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध हाेणार आहेत; तसेच या ईएसआयसीमधील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी या महाविद्यालयात वर्षाला अवघे 24 हजार रुपये शुल्क आकारण्यात येईल.सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी हे शुल्क एक लाख रुपये इतके असणार असल्याची माहिती ईएसआयसीच्या प्रादेशिक संचालक अभिलाषा झा यांनी दिली.राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयाेगाने देशभरातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंदा 2720 पदवी अभ्यासक्रमांच्या जागांना मान्यता दिली आहे. यात 1100 जागा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मंजूर करण्यात आल्या आहेत.राज्यात विविध वैद्यकीय महाविद्यालयांत या अभ्यासक्रमाच्या 350 जागांना मान्यता मिळाली आहे. यात अभिमत विद्यापीठांमध्ये 300 जागांना मान्यता मिळाली आहे.