बेघर झालेल्या परिवारांना माेफत घरे देणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    11-Sep-2025
Total Views |
 
 

CM 
 
शहरात रस्ते विकास, पाणीपुरवठा वितरणाचे सुसूत्रीकरण, सांडपाणी प्रक्रिया, अतिक्रमण हटाव माेहिमेत बेघर झालेल्यांना माेफत घरे देण्याबाबत महापालिकेतर्फे राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययाेजनांचा आढावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. शहरातील बेघर झालेल्या परिवारांना माेफत घर देण्यात येईल. त्यासाठी म्हाडाकडून घरे मिळवण्याची प्रक्रिया राबवावी, असे निर्देश शिंदे यांनी दिले.बैठकीस पालक मंत्री संजय शिरसाट, आमदार अर्जुन खाेतकर व रमेश बाेरनारे, विभागीय आयु्नत जितेंद्र पापळकर, महापालिका आयु्नत जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, सिडकाेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पाेलीस आयु्नत प्रवीण पवार, पाेलीस अधीक्षक डाॅ. विनय कुमार राठाेड आदी अधिकारी उपस्थित हाेते.शहरातील माेकळे झालेल्या रस्त्यांचा विकास करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे; तसेच शहराची पाणीपुरवठा व्यवस्थेबाबत शिंदे यांच्यासमाेर सादरीकरण करण्यात आले. राेज पाणीपुरवठा करण्यासाठी हाेत असलेल्या उपाययाेजना, सांडपाणी प्रक्रिया आदींबाबत आढावा घेण्यात आला. सांडपाणी प्रक्रियेसाठी 830 काेटींची याेजना राबवण्यात येत असून, ती 75 ट्नके पूर्णत्वास आली आहे. पुढील वर्षी जूनपर्यंत ही याेजना पूर्ण हाेईल, असे आयु्नतांनी सांगितले.