याऐवजी खराेखरच्या एखाद्या कंपनीने स्पाॅन्सरशिप द्यावी अशी कल्पना पुढे आली आणि त्यातून एक्स्पेन्सिफाय या कंपनीने सिनेमातल्या कार आणि टीमची स्पाॅन्सरशिप घेतली. इतरही काही कंपन्यांनी असेच करार केले आणि 20 काेटी डाॅलर बजेटपैकी 4 काेटी डाॅलर या माध्यमातूनच उभे राहिले. सिनेमा तुफान चालल्यामुळे तुलनेने स्वस्तातच एक्स्पेन्सिफायचं नाव सगळीकडे पाेहाेचलं.एफ वन म्हणजे फाॅर्म्युला वन रेसिंग.नुकताच या रेसिंगच्या खेळावर एफ वन याच नावाचा सिनेमा आला आहे ब्रॅड पिट या हाॅलिवूडच्या सुपरस्टारचा. त्याने प्रचंड व्यवसायही केला आहे. या सिनेमाच्या निर्मितीच्या वेळी एक वेगळाच पेच तयार झालेला हाेता.
रेसिंग कारच्या प्रत्येक भागावर काेणत्या ना काेणत्या कंपनीचा लाेगाे असताे. एफ वन हा महागडा खेळ आहे, त्यातल्या कार आणि खेळाडूंच्या म्हणजे ड्रायव्हरच्या अंगावरच्या वेषातला प्रत्येक भाग यांच्यावर जाहिराती असतात. या स्पाॅन्सरशिपसाठी अब्जावधी डाॅलर माेजले जातात.जेवढा संघ नामांकित तेवढी जास्त जाहिरात मिळते. सिनेमात एफ वन रेसिंग दाखवायचं, तर त्यातल्या गाड्यांवरही जाहिरात हवी. ती फुकटात कशी करणार? बिनजाहिरातीच्या गाड्या दाखवल्या, बिनलाेगाेचे कपडे दाखवले तर ते सगळंच खाेटं खाेटं वाटणार. नाहीतर मग खाेट्या कंपन्यांची कल्पना करून त्यांची काल्पनिक नावं लिहावी लागणार.