व्हिजन डाॅक्युमेंट-2047 हे राज्याच्या धाेरणात्मक निर्णयांची मार्गदर्शक तत्त्वे

10 Sep 2025 23:19:54
 
 
Vision
व्हिजन डाॅक्युमेंट-2047 ही भविष्यासाठीची आपली मार्गदर्शक तत्त्वे आहेत. या व्हिजननुसार भविष्यातील राज्याची धाेरणे तयार करावीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सह्याद्री अतिथिगृहात विकसित महाराष्ट्र व्हिजन डाॅक्युमेंट-2047 बाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव उपस्थित हाेते. पाणी, वीज, शिक्षण, सामाजिक कल्याण, उद्याेग आणि सेवा, तंत्रज्ञान, अर्थकारण या विषयांवर यावळी सादरीकरण करण्यात आले. बावीस वर्षांनंतर महाराष्ट्र कसा असावा, याचे स्पष्ट चित्र या व्हिजनमधून दिसते. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन राज्याला दिशा देणारा हा आराखडा आहे, असे शिंदे यांनी सांगितले. विकसित महाराष्ट्र व्हिजन प्रत्यक्षात कार्यान्वित हाेऊन महाराष्ट्राचा विकासाचा वेग वाढवेल, असा निर्धार यावेळी व्य्नत करण्यात आला.
 
 
Powered By Sangraha 9.0