पक्ष्यातील तज्ज्ञ इंजिनीअर : सुगरण पक्षी

    10-Sep-2025
Total Views |
 
 
 
sugaran
सुगरण पक्ष्याला इंग्रजीत प्लाेसिअस फिलिपाइन्स (लिनिअस) म्हणतात. चिमणीच्या नराच्या आकाराचा या पक्ष्याच्या पाठीवर भुऱ्या गव्हाळ रंगाचे पट्टे असतात व खाली ताे पांढरा गव्हाळ रंगाचा असताे. त्याची शेपटी शंखरूपी व रुंद टाेकाची असते. या पक्ष्याला इंजिनीअर बर्ड वा व्हीवर बर्डही म्हणतात. तर हिंदीत हा पक्षी बया म्हणून ओळखला जाताे.भारताशिवाय पाकिस्तान, बांगला देश, श्रीलंका इत्यादी देशांमध्येही आढळताे. बाजरी, मका, ज्वारी व इतर प्रकारचे धान्य खाण्यासाठी यांचे थवे शेतात शिरतात व उभ्या पिकांचे नुकसान करतात. धान्यासाेबत ते कीटकही खात असतात.सुगरण पक्षी बाभूळ, कडुलिंब व बाॅटल पाम ट्री अशा हिरव्या झाडांसाेबतच झुडपांमध्येही घरटे तयार करताे. घरट्यासाठी ताे लांब पात्यांचे तंतू निवडताे.
 
हवेत उडत ताे पात्याचे वरचे टाेक अशा प्रकारे पकडताे की, ते चिरत जाऊन एक लांब धाग्याचे रूप घेईल. हेच नैसर्गिक धागे झाडाच्या एका भ्नकम फांदीला गुंडाळून ताे घरटे बनवताे.घरटे बनविण्यासाठी सर्वप्रथम एखाद्या फांदीभाेवती हे नैसर्गिक धागे गुंडाळून ताे मजबूत आधार तयार करताे. नंतर त्या लटकणाऱ्या धाग्यांना आडवा जाेड देऊन ताे फासे टाकताे. फांद्यांवर पुन्हा भिंत तयार करून चारी बाजूंनी बंद करताे आणि गारुड्याच्या पुंगीच्या आकाराचे घरटे विणताे. शेवटी आपल्या आकारानुसार एक वाट तयार करताे.घरटे तयार करण्याचे हे काम नरच करीत असताे.
 
घरट्यात दाेन कप्पे असतात. एक अंडीकप्पा व दुसरा वरचा कप्पा ज्यात मादी स्वत: बसून पिल्लांना अन्न भरवते. प्रजननासाठी व मुलांना झुलवण्यासाठी नर वेगवेगळ्या प्रकारची घरटी बनवताे.नराने घरटे तयार केल्यानंतर मादी वारंवार ते घरटे व्यवस्थित तपासून पाहात असते. ते जेव्हा तिला याेग्य वाटते तेव्हा ती घरट्यात येऊन अंडी घालते. तिने अंडी घालताच नर दुसऱ्या एखाद्या फांदीवर घरटे तयार करण्यास सुरुवात करताे. जे दुसरी एखादी मादी पसंत करते. अशा प्रकारे नर तीन ते चार कुटुंबांचा पिता हाेत असताे. सुगरण पक्ष्यांचा प्रजनन काळ मे ते सप्टेंबर दरम्यान असताे. सुगरण मादी दाेन ते चार पांढरीशुभ्र अंडी देत असताे.