नागपूरच्या विकासासाठी दाेन सामंजस्य करार

    10-Sep-2025
Total Views |
 
 

Nagpur 
राज्यातील भावी आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि वित्तीय केंद्र म्हणून नवीन नागपूर प्रकल्पाला गती मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) आणि केंद्राच्या नवरत्न दर्जाच्या दाेन सार्वजनिक कंपन्या एनबीसीसी (इंडिया) लि. आणि हुडकाे यांच्यात दाेन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले.या करारांमुळे नवीन नागपूरच्या विकासाला चालना मिळणार असून, नागपूरचा आर्थिक व व्यावसायिक चेहरा बदलण्याची संधी उपलब्ध झाली आहे.एनएमआरडीए आणि एनबीसीसीत झालेल्या करारानुसार नवीन नागपूर प्रकल्पातील 1710 एकरांपैकी 1000 एकरांवर विकासकामे हाती घेतली एनबीसीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक के. पी. महादेव स्वामी, हुडकाेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय कुलश्रेष्ठ; तसेच एनएमआरडीएचे आयु्नत संजय मीणा आदी मान्यवर उपस्थित हाेतेजाणार आहेत. उर्वरित 710 एकर पुढील विस्तारासाठी राखीव ठेवण्यात आली आहे.दुसरा करार एनएमआरडीए आणि हुडकाे यांच्यात करण्यात आला. या करारांतर्गत हुडकाे 11300 काेटींचा निधी उपलब्ध करून देणार आहे.