कुंभमेळ्याची कामे पावसाळ्यानंतर; नाशिक जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

10 Sep 2025 23:27:18
 
 

Kumbh 
 
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला हाेणाऱ्या कुंभमेळ्यास कमी कालावधी राहिला असताना विविध विकासकामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. पावसाळ्यानंतर या कामांना सुरुवात केली जाईल, असे नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे नियाेजन करत आहे. साधुग्रामसाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी शर्मा, महापालिका आयु्नत मनीषा खत्री, कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या आयु्नत करिष्मा नायर, उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे आदींनी पंचवटीतील पंचमुखी हनुमान मंदिर, श्री दिगंबर आखाडा, श्री लक्ष्मी नारायण मंदिर, तपाेवनातील कपिला संगमला भेटदेत साधूमहंतांशी संवाद साधला.
 
आगामी कुंभमेळ्यासाठी दाेन वर्षांचा कालावधी राहिला असून, विविध विकासकामांना गती देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून क्षेत्रीय पातळीवर भेट देऊन कामांची पाहणी आणि साधूमहंतांशी संवाद साधत असल्याचे त्यांनी सांगितले.आगामी कुंभमेळा स्वच्छ, पर्यावरणपूरक, सुरक्षित हाेईल, असे नियाेजन करण्यात आले आहे. साधूमहंतांच्या समस्या साेडवण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नियु्नत करण्यात आला आहे.त्यामुळे साधूमहंतांच्या समस्या प्राधान्याने साेडवण्यात येतील, साधुग्रामसाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी तपाेवनातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.
Powered By Sangraha 9.0