नाेकरी बदलण्यापूर्वी विचार करा!

    10-Sep-2025
Total Views |
Job 
Job
1) जाॅबपूर्वी संबंधित विषय किंवा क्षेत्राचं ट्रेनिंग मस्ट असल्यास ते अवश्य घ्या. सकारात्मक मानसिक तयारीसाठी जाॅब स्वीकारल्यानंतर हाेणार्या फायद्यांवर लक्ष केंद्रित करा.
 
2) ऑफिसमधील वातावरण, स्टाफचा असहकार यांसारखी कारणं जाॅब बदलण्यामागे असू नयेत. कारण नव्या जाॅबमध्येही यासारख्या समस्या असण्याची शक्यता आहे.
 
3) नवा जाॅब स्वीकारताना तिथे कमीत कमी सहा महिन्यांचा कार्यकाल पूर्ण करण्याची तयारी ठेवा. ऑफिसचं वातावरण आणि जाॅबचं स्वरुप यांच्याशी जुळवून घेताना आधीच्या जाॅबशी तुलना करणं टाळा.
 
4) नव्या जाॅबची ऑफर स्वीकारण्यापूर्वी तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर स्ट्रेसशी सामना करावा लागणार आहे हे मनात पक्के लक्षात ठेवा. या काळात शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जपा. या बाबतीत तुम्हाला मेडिटेशन आणि सकारात्मक दृष्टीकाेनाचा फायदा निश्चितच हाेईल.
 
5) केवळ झटपट यश, पैसा आणि प्रमाेशन यांच्यामागे लागून सध्याचा जाॅब बदलू नका. लक्षात ठेवा, प्रत्येक गाेष्टीला एका ठराविक कालावधीची गरज असते. त्यामुळे अवास्तव अपेक्षा बाळगू नका. त्यातून फस्ट्रेशन निर्माण हाेऊन जाॅब साेडण्याचा निर्णय घेत असाल तर वेळीच सावध व्हा.
 
तुमच्या अस्थिर स्वभावातूनच उगीचच जाेखीम वाढवू नका.यादरम्यान फॅमिलीच्या पाठबळाची आवश्यकता असते. त्यामुळे निर्णय घेताना त्यांना विश्वासात घ्यायला विसरू नका. एकदा ठरवल्यावर ठामपणे ध्येय मांडा. तुमचा करिअर चार्ट तयार करा. तुम्हाला नवीन नाेकरीच्या ठिकाणी काय करावं लागणार आहे याचा गांभीर्याने विचार करा.