नैराश्य येण्यामागचे रहस्य आतड्यांमध्ये दडलंय का!

10 Sep 2025 23:40:16
 

Health 
 
विद्यापीठाचे मानसाेपचार तज्ज्ञ व्हॅलेरी टेलर यांनी माणसांवर परीक्षण सुरू केले.त्यांनी बायपाेलर डिसऑर्डरसारख्या आजारांद्वारे सुरुवात केली. जे बरे करणे सर्वांत अवघड मानले जाते. त्यांना वाटले हाेते की, जर त्या केसेसमध्ये विष्ठा सूक्ष्मजीव प्रत्याराेपण (फीकल मायक्राेबायाेटा ट्रान्सप्लांट FMT)उपयुक्त ठरले तर हे इतर आजारांमध्येही मदत करू शकते. सुरुवतीच्या अध्ययनात दिसले की आतड्यांच्या सूक्ष्मजंतू जगात बदल केल्यामुळे मूड उत्तम हाेऊ शकताे.पण FMT प्रत्येक व्यक्तीवर एकसमान परिणाम करीत नाही पण काही रुग्णांसाठी हे जीवन बदलणारे सिद्ध झाले. पण एक समस्या आहे. FMT मुळे हे स्पष्ट हाेऊ शकत नाही की, काेणते विशिष्ट जंतू यासाठी जबाबदार आहेत. विशेष म्हणजे दीर्घ काळापासून नैराश्य व चिंता मेंदूची रासायनिक प्रक्रिया, जीन वा जीवनाच्या परिस्थितीशी जाेडले जात आले आहे.
 
पण आता संशाेधनातून आढळून आले आहे की, आपल्या आतड्यांमध्ये असलेल्या सूक्ष्म जंतूंचे जग म्हणजेच बॅ्नटेरिया, बुरशी व इतर सूक्ष्म जंतूंचे विशाल जग, आपला मूड नियंत्रित करण्यात माेठी भूमिका बजावताे. सुरुवातीला वैज्ञानिकांनी फक्त एक सहसंबंध पाहिला हाेताे. ज्या लाेकांना नैराश्य व चिंता हाेती, त्यांच्या आतड्यांत आढळले जाणारे सूक्ष्म जंतू सुदृढ लाेकांपेक्षा वेगळे हाेते. नंतर 2016 मध्ये दाेन वेगवेगळ्या अध्ययनात जेव्हा नैराश्यग्रस्त माणसांची विष्ठा उंदरांच्या आतड्यांमध्ये टाकली तेव्हा उंदरांमध्येही नैराश्याची लक्षणे दिसू लागली. ते आनंद वा सुखाचा अनुभव घेण्याची रुची गमावून बसले. त्यांच्या चिंतेसारख्या हरकती दिसल्या व त्यांच्या मेेंदूच्या रासायनिक प्रक्रियाही बदलल्या.या शाेधातून हे स्पष्ट झाले की, मानसिक आजार फक्त जीन वा एखाद्या ध्न्नयाने हाेत नाही तर सूक्ष्म जंतूद्वारेही स्थानांतरित हाेऊ शकतात. यातून एक नवा प्रश्न उभा राहिला. जर राेगट सूक्ष्मजंतू आजार पसरवू शकतात तर सुदृढ सूक्ष्मजंतू आपल्याला पुन्हा सुदृढ बनवू शकतात का? उत्तराच्या दिशेने पहिले पाऊल याने प्रेरित हाेऊन कॅलगरी
Powered By Sangraha 9.0