ग्रामविकास मंत्रालयाकडून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे उपयु्नत अभियान 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबरदरम्यान राबवण्यात येणार आहे. गावांचा विकास हाेण्याच्या दृष्टीने हे सकारात्मक पाऊल आहे. या अभियानात सर्व ग्रामस्थांनी मिळून एकत्रित काम केल्यास गावांचा विकास शक्य असल्याचे मत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्य्नत केले. रायगड जिल्हा परिषदेंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा कुरुळमध्ये पार पडली. यावेळी त्या बाेलत हाेत्या. राेहयाे मंत्री भरत गाेगावले, ‘यशदा’चे उपमहासंचालक डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भाेसले, जिल्हा पाेलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्यासह जिल्हा परिषद खातेप्रमुख, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच उपस्थित हाेते. गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या अभियानांतर्गत विविध याेजना नागरिकांच्या दारी पाेहाेचतील.सर्व याेजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वाेताेपरी सहकार्य करू, असे गाेगावले यांनी सांगितले.