हँग ग्लायडिंगने उडण्याची इच्छा पूर्ण करू शकता

09 Aug 2025 14:15:17
 

hang 
पक्ष्यांना आकाशात पंख पसरून उडताना पाहून आपल्यालाही त्यांच्यासारखे उडावेसे वाटते. पण आपल्याला उडता येत नाही ना. मुलांनाे, असे निराश हाेऊ नका. तुम्हीही माेठे झाल्यावरा हँग ग्लायडिंगच्या मदतीने उडू शकता. हे हँग ग्लायडिंग म्हणजे काय ते जाणून घेऊया. हँग ग्लायडिंगमध्ये डेल्टा आकाराचे एक पॅराशूट असते. जे एका फ्रेममध्ये बांधून माणसाला बसवले जाते.वातावरणात वर जाताना गरम वाऱ्यामुळे आकाशात हे वर जाते. आकाशात उडण्याचे हे तंत्र 1973 मध्ये ऑस्ट्रेलियन वैज्ञानिकांनी आधुनिक खेळाच्या रूपात दिले. एका अंदाजानुसार या वेळी जगात सुमारे 6 लाख हँग ग्लायडिंग पायलट आहेत. हँग ग्लायडिंगच्या साहसाची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी देशात दाेन सेंटर उत्तर व पश्चिमेत उपलब्ध आहेत.उत्तर सेंटरमध्ये हिमाचल प्रदेशातील धर्मशालाजवळ हँग ग्लायडिंगचे प्रशिक्षण दिले जाते. पश्चिम सेंटरमध्ये कार्ला, सिंहगड किल्ला व पाचगणीत प्रशिक्षण देतात. हँग ग्लायडिंगच्या मदतीने आपण आपली उडण्याची इच्छा पूर्ण करू शकताे.
Powered By Sangraha 9.0