महाराष्ट्र आणि दक्षिण काेरियादरम्यान वस्त्राेद्याेग क्षेत्रात व्यापारवृद्धीची माेठी संधी आहे. राज्यातील कापूस आणि दक्षिण काेरियातील टेक्स्टाइल मशिनरीच्या माध्यमातून भागीदारीने परस्पर संबंध अधिक वृद्धिंगत हाेतील, असा विश्वास राजशिष्टाचार मंत्रीजयकुमार रावल यांनी व्य्नत केला.दक्षिण काेरियाचे महावाणिज्यदूत डाेंगवान यू यांनी रावल यांची सह्याद्री अतिथिगृहात सदिच्छा भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र आणि द. काेरियादरम्यान व्यापारवृद्धीच्या विविध संधींवर चर्चा करण्यात आली.महाराष्ट्र हे भारताचे पाॅवर हाऊस आहे. उत्पादन क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर देऊन महाराष्ट्र आणि द.काेरियादरम्यान व्यापारवृद्धीच्या संधी निश्चित करण्यावर भर देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने महाराष्ट्र आणि द. काेरियात गुंतवणूक आणि व्यापाराच्या विविध संधी विचारात घेऊन इच्छुकांना प्राेत्साहन देता येईल, असा विश्वास रावल यांनी व्य्नत केला. व्यापार आणि गुंतवणुकीच्यादृष्टीने महाराष्ट्र हे भारतातील महत्त्वाचे राज्य असल्याचे डाेंगवान यू यांनी सांगितले. 12 ऑक्टाेबरला मुंबईत हाेणाऱ्या काेरियन महाेत्सवासाठी त्यांनी रावल यांना निमंत्रण दिले.