दुर्गंधीयु्नत श्वास आराेग्याला अपाय

07 Aug 2025 23:04:31
 

Health 
 
दुर्गंधीयु्नत श्वास जेव्हा दुसऱ्याच्या नाकात जाताे तेव्हा ताे एखाद्या विषारी पदार्थाएवढाच हानिकारक असू शकताे.या विकाराविषयी रुग्णाला स्वत:ला कळत नसते. जेव्हा दुसरा काेणी नाक मुरडताे वा ताेंड वाईट करताे तेव्हा ते त्याला जाणवते.काहीजण तर सरळ ताेंडावर सांगायला मागे-पुढे पाहात नाहीत.पण एखाद्याने टाेकल्यानंतर आपल्याला कळायला हवे की, आपण ताेंड उघडताच समाेरच्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या तर त्याचा अर्थ आपण डेंटिस्टकडे जाण्याची गरज आहे. श्वासदुर्गंधीचा आपल्या साेशल लाइफवर दुष्परिणाम हाेताे. अशा व्यक्तीला आपल्याजवळ बसवायला लाेक कचरतात. प्रेमाच्या संवादासाठी तर श्वासाची दुर्गंधी सर्वांत जास्त घातक असते.एका बिझनेसमॅनने आपल्या मित्राविषयी सांगितले की, त्याची एकच तक्रार हाेती की, काेणतीही स्त्री त्याच्याजवळ येऊन त्याच्याशी बाेलतच नाही. एवढेच नव्हे तर त्याची पत्नीही त्याच्याकडे यायला कचरते.
 
तेव्हा मी त्याला सल्ला दिला की, राेज सकाळी पाण्यात तुरटी पावडर टाकून त्याने गुळण्या कर. त्याने ते ऐकले आणि काही दिवसांत परिस्थिती बदलली.कारण श्वासदुर्गंधी एक राेग आहे. सामान्यत: चुकीच्या पद्धतीने खाण्या-पिण्यामुळे हा हाेताे. अंडी, मटण, मासे व असे पदार्थ खाणे, जे व्यवस्थित शिजवले जात नाहीत वा न झाकता ठेवले जातात. भजी जास्त खाणे, अंदाधुंद मद्यपान, विनाकारण आंबट खाणे. पाेट साफ न हाेणे आणि दात याेग्यप्रकारे साफ न करणे या राेगाचे कारण असू शकते.खूप जादा लसूण, कांदा, मसालेदार पनीर वा जादा मिरचीचे पदार्थ खाण्यामुळेही हा आजार हाेऊ शकताे. जास्त गाेड खात राहिल्यामुळेही हा राेग वाढताे.धूम्रपानामुळेही हा हाेऊ शकताे. घशाचे आजारही याचे कारण असू शकते.
Powered By Sangraha 9.0