सगळ्यात उंच प्राणी

    07-Aug-2025
Total Views |
 

animal 
 
बेल्जियन घाेडा हा घाेडा ‘बिग जॅक’ नावाने ओळखला जाताे. यांची उंची नेहमीच्या घाेड्यांच्या तुलनेत प्रचंड आहे. बेल्जियन गेल्डिंग घाेडा बिग जेकने त्याच्या असाधारण उंचीसाठी जगभरात प्रसिद्धी मिळवली. त्याची उंची 20 हात 2.75 इंच (210.19 सेमी, 82.75 इंच) इतकी हाेती. 19 जानेवारी 2010 राेजी अधिकृतपणे सर्वात उंच घाेडा बनला.गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डचा किताब मिळवल्यापासून, शेकडाे पर्यटकांनी अमेरिकेतील विस्काॅन्सिनमधील पाॅयनेट येथील स्माेकी हाेलाे फार्ममध्ये भव्य घाेडा पाहण्यासाठी गर्दी केली हाेती. दिवसातून दाेनदा धान्याची पूर्ण बादली आणि राेज सुमारे एक गठ्ठा गवत ताे खात असे. बिग जेकचा जन्म नेब्रास्कामध्ये झाला हाेता आणि जन्मावेळी त्याचे वजन 240 पाैंड (109 किलाे) हाेते.सामान्य बेल्जियन पाळीव प्राण्यापेक्षा जन्मावेळी सुमारे 100 पाैंड (45 किलाे) जास्त हाेते. ‘ड्राफ्ट हाॅर्स शाे’ स्पर्धांमध्ये त्याने भाग घेतला हाेता आणि विस्काॅन्सिन स्टेट फेअरमध्ये ताे दाखवण्यात आला. जून 2021 मध्ये त्याचे निधन झाले.