पर्यावरणपूरक गणेशमूर्तींसाठी ठाण्यात कार्यशाळा

06 Aug 2025 23:11:14
 

Thane 
 
पर्यावरणपूरक गणेशाेत्सव साजरा करण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. ठाणे महापालिकाही गेल्या दाेन वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्तीला प्राधान्य देण्याचे आवाहन नागरिकांना करत आहे. यंदा महापालिकेने ‘माझे घर, माझा गणपती’ या संकल्पनेंतर्गत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडवण्यासाठी कार्यशाळा आयाेजिल्या आहेत. शहरातील विविध ठिकाणी महिन्याभरापासून या कार्यशाळा घेतल्या जात आहेत. पर्यावरण दक्षता मंडळ आणि इतर सामाजिक संस्थांचे सहकार्य या उपक्रमासाठी घेण्यात आले आहे. या कार्यशाळा सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुल्या असून, त्यासाठी नाेंदणी करणे आवश्यक आहे. आतापर्यंत 100 हून अधिक नागरिकांनी शाडूपासून गणपती मूर्ती घडवल्या आहेत. अधिकाधिक नागरिकांना सहभागी हाेता यावे यासाठी कार्यशाळांची संख्या आणि ठिकाणे वाढवण्यात येत असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली. या कार्यशाळांच्या नाेंदणीसाठी पर्यावरण दक्षता मंडळाच्या प्रतिनिधींशी 9920772869 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0