आम्हीं तनुमनुजीवें। तुझिया बाेला वाेटंगावें। आणि तुवांचि ऐसें करावें। तरी सरलें म्हण।। (3.12)

06 Aug 2025 23:02:27
 
 

saint 
ज्ञानेश्वरीचा एक महत्त्वाचा विशेष असा की, या गं्रथात श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यांतील प्रेमाचे माेठे हळुवार वर्णन वारंवार आले आहे.
अर्जुन माेहग्रस्त आहे. या माेहामुळे ताेच परमात्म्याला ज्ञान सांगत आहे, असे असले तरी परमात्म्याचे चित्त अर्जुनाविषयी अत्यंत प्रेमळ आहे. अशा या प्रेमळ सख्याला म्हणजे श्रीकृष्णांना अर्जुन म्हणाला, ‘देवा, आत्तापर्यंत तुम्ही म्हणालात ते सर्व मी नीट ऐकले आहे.ब्रह्मस्थितीत कर्म व त्याचा कर्ता यापैकी काहीच उरत नाही असे तुमचे मत दिसते. तर मग तुम्ही मला युद्ध करण्याचा आग्रह का करता? माझ्याकडून युद्ध करवून घेण्यात तुम्हांला कसलाच संकाेच वाटत नाही का? असे हे हिंसात्मक कर्म तुम्ही माझ्याकडून का करवून घेता? देवा, तुम्ही कर्माचा लेशही उरू नये असे म्हणता आणि माझ्याकडून भयानक युद्ध करविता, याचा मेळ कसा बसावा?
 
‘देवा, तुमच्या अशा संदिग्ध बाेलण्यामुळे माझ्यासारख्या अज्ञानी माणसाने काय करावे? माझ्यात आता विवेक निर्माण हाेईल अशी आशाच खुंटली आहे. तुमच्या बाेलण्याला जर उपदेश म्हणावा तर मग आणखी दुसरा भ्रम ताे काेणता? अशा उपदेशाने आत्मबाेध कसा हाेणार? वैद्य पथ्य सांगताे, पण ताेच जर विष देईल तर राेग्याचा दाेष कसा दूर हाेणार? आंधळ्याने आडमार्गाला जावे किंवा माकडाला दारू पाजावी, त्याप्रमाणे देवा, तुमच्या उपदेशामुळे माझे झाले आहे. मी अज्ञानी आहे.तुम्ही याेग्य विचार सांगाल असे वाटले, पण नवल असे की, देवा, तुमच्या विचारांत गुंताच अधिक दिसताे. आम्ही तुला सर्वस्व अर्पण करावे आणि तूच जर असे बाेलावेस तर सर्व संपलेच नाही का?’
Powered By Sangraha 9.0