दक्षिण आफ्रिकेच्या महावाणिज्यदूतांनी रावल यांची भेट घेतली

06 Aug 2025 23:04:48
 
 


SA
महात्मा गांधी यांच्या दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्यापासून महाराष्ट्र आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ऐतिहासिक संबंध आहेत. हे संबंध व्यापारवृद्धीच्या माध्यमातून अधिक दृढ करण्यास महाराष्ट्र उत्सुक असून, खनिज उत्खनन क्षेत्रात व्यापारवृद्धीच्या माेठ्या संधी आहेत, असे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेचे महावाणिज्यदूत गिडीयन लबाने यांनी रावल यांची सह्याद्री अतिथीगृहात सदिच्छा भेट घेतली. यावेळी दाेघांनी व्यापारवृद्धीच्या क्षेत्रांबाबत चर्चा केली. महाराष्ट्र हे भारताचे पाॅवर हाऊस आहे. येथे पर्यटनाबराेबरच विविध क्षेत्रांत विकासाच्या संधी आहेत. खनिज उत्खनन, विविध उत्पादने आदी क्षेत्रे निश्चित करून महाराष्ट्र आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान व्यापार वृद्धी शक्य आहे. याच माध्यमातून दाेघांतील ऐतिहासिक संबंध अधिक वृद्धिंगत हाेतील, असा विश्वास रावल यांनी व्यक्त केला.
 
 
Powered By Sangraha 9.0