असा करा झटपट स्वयंपाक

06 Aug 2025 23:18:49
 

food 
नाेकरदार महिला जेव्हा दमून भागून घरी जाते तेव्हा किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करणे तिच्यासाठी एखाद्या नाेकरीपेक्षा कमी नसते. झटपट काहीतरी बनवावे असे तिला वाटत असते. ही समस्या साेडवण्यासाठी बाजारात निरनिराळी ‘रेडी टू इट’ची पॅकेट सहजतेने मिळतात. पण सर्वानाच ती खरेदी करता येत नाहीत. कारण एकतर ती महाग असतात शिवाय त्यात फॅट, साॅल्ट वा शुगरचे प्रमाण जास्त असते. यापेक्षा इस्टंट कुकिंगची इडली, रवा, डाेसा अशी पॅकेट चांगली असतात. आता जेवणाबाबत लाेक दक्ष झाले आहेत. रेडिमेड उत्पादनांतील फॅट, शुगर काढण्याच्या नादात आवश्यक अँटीऑ्निसडेंट, फायबर, मिनरलही बाहेर जातात.त्यामुळे शरीराला हे घटक मिळत नाहीत. अर्थातच घरी बनवलेल्या स्वयंपाकाचा काेणताही पदार्थ सामना करू शकत नाही.जर राेज रात्री स्वयंपाक करावयाचा म्हटल्यास आपला मूड ऑफ हाेत असेल तर झटपट स्वयंपाक करायला शिका.
 
स्वयंपाक झटपट हाेण्यासाठी : यासाठी चार मुख्य गाेष्टी लक्षात ठेवाव्यात. पहिली गाेष्ट म्हणजे किचन व्यवस्थित असावे. त्यामुळे वेळ खूपच वाचताे. दुसरी महत्त्वाची गाेष्ट म्हणजे शिजवण्याची व खाण्याची भांडी याेग्य असावीत. तसेच आपल्याकडे किचनमधील सर्व आधुनिक गॅझेट्स असावीत. तिसरी गाेष्ट म्हणजे किराणा व पाण्याची याेग्य व्यवस्था असावी. शेवटची महत्त्वाची गाेष्ट म्हणजे आपल्या हुशारीसाेबत कुटुंबीयांच्या आवडीचा व त्यांच्यानुरूप मेन्यू प्लॅन करावा.
Powered By Sangraha 9.0