‘संपूर्णता’मध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान

06 Aug 2025 23:15:25
 

CM 
 
‘आकांक्षित जिल्हे व तालुके’ कार्यक्रमांतर्गत 1 जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत राबवण्यात आलेल्या संपूर्णता अभियानातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गाैडा जी.सी. यांच्या वतीने प्रभारी जिल्हाधिकारी डाॅ. नितीन व्यवहारे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गाैरव करण्यात आला.येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या सभागृहात राज्यस्तरीय सन्मान समारंभ पार पडला. जिल्हाधिकारी गाैडा यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर जिल्ह्याने संपूर्णता अभियानातील सहापैकी सहा इंडिकेटर्स पूर्ण केले. विशेष बाब म्हणजे यापैकी तीन इंडिकेटर्स आराेग्य विभागाशी संबंधित असून, ते 100 टक्के समृद्ध करण्यात आले हाेते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव राजेश कुमार देवरा, अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे, अप्पर मुख्य सचिव (नियाेजन) राजकुमार यावेळी उपस्थित हाेते. जीवती तालुक्यातील यशस्वी सहभागाचे प्रतिनिधित्व करत गटविकास अधिकारी लक्ष्मीनारायण दाेडके, तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. स्वप्निल टेंभे, आकांक्षित तालुका समन्वयक गणेश चिंटकुंटलवार व ‘उमेद’चे राजेजी दुधे यांनीही सन्मान स्वीकारला.
Powered By Sangraha 9.0