इंजिनीअरिंगचा चमत्कार या दुर्गम डाेंगररांगांमध्ये रूळ टाकणे खूप अवघड काम हाेते. पण तरीही भारतीय रेल्वेने ते करून दाखविले. 51 कि.मी.रूळ, त्यात 12.63 कि.मी. लांबीचे 48 बाेगदे, 55 माेठे आणि 89 लहान पूल तयार केले आहेत. इथे देशाचा सर्वात उंचीचा (104 मी.) रेल्वे पियर पूल सुद्धा आहे. ताे कुतुबमीनारपेक्षा 42 मी. उंच आहे.