
thoughts
जे मन सारखे भूतभविष्याचा विचार न करत्ता सदैव एकाग्र राहू शकेल यांसाठी आपण काेणत्या पद्धतीने आपल्या विचारांचे नियमन करु शकताे? आपल्या मनांत येणार्या अनावश्यक विचारांवर प्रभुत्व कसे मिळवावे ते शिकले पाहिजे.भूतकाळ विसरता येत नसताे पण त्याला कसे सामाेरे जायचे हे ठरवता येते. आपण पूर्व घटनांचा विचार करण्याचे कारण त्या घटनांचे आपल्या मनांत पूर्ण निरसन झाले नसते. त्या आपल्याला पूर्णपणे समजल्या नसतात किंवा आपण त्यांचा पूर्णपणे स्विकार केला नसताे.भूतकाळातील घटनांचा समजून स्विकार केल्याने आपल्या जीवनाला स्वातंत्र्य आणि स्पष्टता येते. नुकत्याच घडलेल्या आणि काही काळापूर्वी घडलेल्या घटना यांचा वेगळा स्वतंत्र विचार करणे उपयुक्त ठरते.
संस्कार चित्त काही काळ (आठवडे) नुकत्याच घडलेल्या घटनांची जागृत मनाला सारखी आठवण करून देईल.त्या घटनांचे निरसन न झाल्याचे हे एक स्पष्ट चिन्ह आहे.काही आठवड्यानंतर ह्या आठवणी हाेणे बंद हाेईल आणि हा अनुभव दडपून टाकण्यात येईल. हे अनुभव संस्कार चित्तात साठविल्या जातात. त्याचा परिणाम हाेताे एक चिंताग्रस्त,संतप्त स्वभाव. म्हणून या आठवणी हाेत असतांनाच केवळ वाट पाहून विसरून जाण्याची अपेक्षा ठेवण्यापेक्षा या अनुभवांचे निरसन करणे श्रेयस्कर असते. एखाद्या घटनेचा निर्णय लावून ते प्रकरण संपविण्यासाठी संबंधित लाेकांशी चर्चा करणे उचित असते.आपण कुणाचे मन दुखावले असेल तर त्यांची क्षमा मागणे याेग्य आहे.
कुणी आपले स्वतःचे मन दुखावले असेल तर आपण त्यांना क्षमा करावी. याप्रमाणे त्या प्रसंगातील भावनेच्या भागाचे निरसन करण्यास येते आणि ते प्रकरण संपविण्यात येते.काही काळ हाेऊन गेलेल्या अपूर्ण अनुभवांचीही अनेकदा पण नवीन अनुभवांपेक्षा कमी वेळा आठवण येत राहील. साधारणतः अशा प्रसंगासाठी माफी मागणे किंवा क्षमा करणे याेग्य नाही कारण दुसर्या व्यक्तींना एवढा काळ निघून गेल्यानंतर त्या प्रसंगाचा पुन्हा उल्लेख करण्याचे प्रयाेजन कळणार नाही. त्यावर वेगळा साेपा उपाय म्हणजे एका कागदावर आपल्याला त्रासदायक वाटणार्या गाेष्टी लिहून ताे कागद मनांत त्या आठवणींचा अंत व्हावा या संकल्पाने जाळावा. यामुळे तुम्हाला या प्रसंगांची आठवण येईल, परन्तु त्यात त्याबराेबरच्या भावना नसतील.