तैसीं इंद्रियेंआपैतीं हाेती। जयाचें म्हणितलें करिती। तयाची प्रज्ञा जाण स्थिती। पावली असे।। (2.353)

05 Aug 2025 23:16:56
 
 

saint 
स्थिरबुद्धी अथवा स्थितप्रज्ञ माणसाचे सविस्तर वर्णन ज्ञानेश्वर महाराज करीत आहेत.येथे आणखी एक नवलाची गाेष्ट अशी की, रागद्वेषच जर नष्ट झाले तर विषयांचा संग पुरुषास बाधक हाेत नाही. जाे पुरुष आत्मसुखाशी एकरूप असताे ताे खरे पाहता विषयाबद्दल उदासीन असताे.ताे कामक्राेधहीन असताे. विषयांतही ताे आत्मतत्त्वच पाहताे. अशा पुरुषाला संसाराचे काेणतेही दु:ख भासत नाही. ज्याच्या पाेटात अमृताचा झरा वाहत आहे त्याला दु:ख काेठले? आत्मसुखात लीन झालेल्या माणसास विषाद काेठला? निवाऱ्यात असलेली ज्याेत स्थिर असते तसा ताे पुरुष आत्मरूपात स्थिर हाेताे.परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर करणे हाही एकयाेगच आहे. चित्त स्थिर झाले नाही तर मनास शांतता मिळणार नाही.
 
मग सुखही अर्थातच नाही. अग्नीत टाकलेले बीज असे उगवणार नाही, तसे अशांत मनुष्याचे चित्त कधीही सुखी हाेणार नाही. आपले चित्त आत्म्याच्या ठिकाणी स्थिर न हाेणे हेच सर्व दु:खांचे बीज आहे. म्हणून बाह्य विषयापासून इंद्रियांना आवरून धरणे अगत्याचे आहे. इंद्रियांना सुख देणारे विषय जर पाहू लागलाे तर मग संसारसागर तरून जाण्याची आशाच संपते.तीराला लागलेली नाव जर वादळात सापडली तर ती बुडण्यापासून वाचली तरी पुन्हा बुडतेच.त्याप्रमाणे मनुष्य इंद्रियांच्या अधीन झाला तर ताे सुखदु:खांनी व्याप्त हाेताे. म्हणून अर्जुना, आपली इंद्रिये आपल्या स्वाधीन असणे ह्यापेक्षा दुसरे काहीच असणे महत्त्वाचे नाही. एकदा इंद्रिये स्वाधीन झाली, त्यांच्यावर स्वामित्व प्राप्त झाले की, अशा पुरुषाची बुद्धी स्थिर झाली असे समजावयास हरकत नाही.
Powered By Sangraha 9.0