अजीर्ण टाळण्यासाठी दिलीप कुमारचा सल्ला

05 Aug 2025 23:11:26
 
 

kumar 
दिलीप कुमारने एका मुलाखतीत मिर्झा गालिब यांच्या एका वचनाचा उल्लेख केला हाेता हूर हाे या परी, अगर गले का हार बन जाये ताे जिंदगी अजीरन बन जाती है. एखादी अप्सरा असाे किंवा परी असाे, ती जर गळ्यातला हार बनली तर अजीर्ण हाेतंच त्या साैंदर्याचंही.संदर्भ आहे अभिनेत्यांनी किती सिनेमे करावेत आणि कसे करावेत, याचा. दिलीप कुमार म्हणताे, काेणताही कलाकार लाेकांना कितीही प्रिय असला तरी एखाद्या आवडत्या पदार्थाप्रमाणे नाश्त्यातही ताेच, दुपारच्या जेवणातही ताेच, रात्रीच्या जेवणातही ताेच, असा दिला तर हळूहळू बाेअर करायला लागताे. अभिनेते जेव्हा पडद्यावर वारंवार दिसायला लागतात तेव्हा लाेकांना त्याच्या सिनेमातल्या कामांमध्ये रिपिटिशन दिसायला लागतं. या व्यक्तिरेखेत त्या व्यक्तिरेखेची झलक आहे, हे दिसायला लागतं. अनेकदा त्याचं स्वत:चं व्यक्तिमत्त्वच पडद्यावर साकार व्हायला लागतं. नट आणि व्यक्तिरेखा यांत काही फरक राहात नाही. असं काम करून उपयाेग काय? लाेक का पाहायला येतील तेच तेच? त्याने गंगा जमना, देवदास वगैरे सिनेमांमधल्या व्यक्तिरेखांची उदाहरणं देऊन सांगितलं आहे की या व्यक्तिरेखा एकमेकांपासून वेगळ्या हाेत्या आणि त्या साकारणाऱ्या अभिनेत्यापेक्षाही वेगळ्या हाेत्या. शिवाय, सिनेमांमध्ये अंतर हाेतं, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता टिकून राहिली.
Powered By Sangraha 9.0