मुलांशी रंजक शैलीत व साेप्या भाषेत ायनान्सच्या गाेष्टी करा

04 Aug 2025 12:23:46
 

Parents 
 
घरात मुलांशी ायनान्सवर बाेलण्यासाठी वेळ काढा. आठवड्यातून वा महिन्यातून एकदा मुलांसाेबत बसून त्यांच्याशी जमाखर्चावर बाेला. काही अशाप्रकारे बाेला की हा विषय मजेशीर हाेईल. कारण मुलांना गांभीर्य बाेअर करीत असते.बाेलण्याची सुरुवात अशा प्रकारे करता येऊ शकते की, या वर्षी उन्हाळ्याच्या सुटीत सिमल्याला जाण्यासाठी आपण विमानाऐवजी टे्रनची तिकिटे घेतली आहेत. असे केल्यामुळे दहा हजार रुपयांची बचत हाेत आहे आणि एवढ्या पैशात खाण्या-पिण्याचा संपूर्ण खर्च निघून येईल. यामुळे खर्चाचा हिशेब ठेवण्यात आणि अ‍ॅडजेस्ट करण्यात त्यांची रूची वाढेल.हीच गाेष्ट आपण त्यांना अ‍ॅकेडमिक पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला तर ते त्यात रस घेणार नाहीत. ज्या गाेष्टींमध्ये ते सरळ सामील असतात त्या विषयी ते तसेही जाणू इच्छित असतात.
 
आत्तापर्यंत शालेय शिक्षणात ायनान्शियलगाेष्टींकडे जास्त लक्ष दिले गेलेले नाही.अभ्यासक्रमात ज्याप्रमाणे सायन्स आणि टेक्नाॅलाॅजीत काळानुसार अपडेट हाेत राहतात त्याप्रमाणे ायनान्समध्येही हाेऊ शकतात.असे का हाेते याचा आपण विचार केला आहे का? थाेडा विचार करा. भाजी वा किराणा सामान विकणारे सामान्य व्यावसायिक, शेतकरी आणि इतर माणसे पैशाचा हिशेब कसा ठेवतात. यापैकी बहुतेकांनी तर शालेय शिक्षणही घेतलेले नसते. वास्तविक त्यांना घरातूनच लहानपणापासून हिशेबाचे, घरगुती व सामान्य भाषा-व्यवहाराचे शिक्षण मिळालेले असते. त्यामुळे ते सहजपणे शिकतात आणि समजतात. अशाप्रकारेच घरातील महिलांमध्येही हिशेबाचे आणि मॅनेजमेंटची साेपी समज असते. हीच पद्धत आपण आपल्या मुलांसाेबतही वापरू शकताे.
Powered By Sangraha 9.0