गणेशोत्सवात मोफत आरोग्यतपासणी शिबिराचे आयोजन

30 Aug 2025 14:00:29
 
bh 
पुणे, 29 ऑगस्ट
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि इंद्राणी बालन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाच्या कालावधीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दर्शनासाठी आणि देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ मिळणार आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी या उपक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले, रंगारी गणपती ट्रस्ट आणि इंद्राणी बालन फाऊंडेशन यांच्या माध्यमातून गणेशोत्सवात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
 
s 
 
प्रामुख्याने गणेशभक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले जात आहे. या वर्षी 5 सप्टेंबरपर्यंत सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळीत आरोग्य शिबिर होणार आहे. या शिबिरात सीबीसी, कोलेस्टोरॉल, क्रेटिन, एसजीओटी, एसजीपीटी, आरबीएस, ब्लड, युरिन, बिलीरुबिन अशा महत्त्वाच्या तपासण्या होणार आहेत. या तपासण्याचे अहवाल मोबाइलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आरोग्य शिबिरासाठी गणेशभक्त थेट आरोग्य शिबिरस्थळी नाव नोंदवून तपासणी करू शकतात. ऑनलाइन पद्धतीने नाव रजिस्टर करून आपले नाव नोंदवू शकतात. ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी https://bit. ly/ arogyashibir ही लिंक वापरता येऊ शकेल.
 
अध्यात्मिक उत्सवात आरोग्योत्सवाचा जागर
भक्तांना चांगले आरोग्य लाभावे, हा आपल्या आध्यात्माचा पाया आहे. पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाला येणाऱ्या भाविक-भक्तांसाठीही चांगले आरोग्य लाभावे, या हेतूने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि इंद्राणी बालन फाऊंडेशनने आध्यात्मिक उत्सवात आरोग्योत्सवाचा जागर करण्याचा निर्णय आम्ही घेतला. अधिकाधिक गणेशभक्तांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, ही विनंती.
- पुनीत बालन, उत्सव प्रमुख व वेिशस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट
Powered By Sangraha 9.0