पुणे, 26 ऑगस्ट (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा प्रेरणादायी आध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते बुधवारी (27 ऑगस्ट) दुपारी 12 वाजून 15 मिनिटांच्या मुहूर्तावर होणार आहे. त्यापूर्वी ढोल-ताशांच्या गजरात जंगी मिरवणूक देखील निघणार आहे. मंडळाचे उत्सवप्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी ही माहिती दिली. बालन म्हणाले, ‘गणेश चतुर्थीला सकाळी बाप्पाची आरती होईल. त्यानंतर सकाळी 8.30 वाजता प्रत्यक्ष मिरवणूक सुरू होईल. त्यामध्ये सुरुवातीला लाठीकाठी हा मर्दानी खेळ आणि केशव शंखनाद होईल. त्यानंतर 7 पथकांकडून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनासमोर ढोल-ताशांची सलामी दिली जाणार आहे.
’ श्रीराम पथक, कलावंत, वाद्यवृंद, विश्वगर्जना, स्वयंभूगर्जना, गजर, नूमवि ही सात ढोल-ताशा पथके बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. या सर्व पथकांच्या वादन मिरवणुकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाचे वाजतगाजत आगमन होईल. दुपारी 12 वाजून 15 मिनिटांच्या मुहूर्तावर प्रेरणादायी आध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याचे पुनीत बालन यांनी सांगितले.
बाप्पाचा रथ मंडळाचे कार्यकर्ते ओढणार
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची ंदाही वाजत-गाजत मिरवणूक निघेल. प्रेरणादायी आध्यात्मिक वक्त्या जया किशोरी हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मागील वर्षी बाप्पाच्या दर्शनासाठी भेट दिली असता, ा हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्याची इच्छा त्यांनी केली होती. त्यानुसार यंदा हा मान त्यांना आला आहे. गणपती बाप्पाचे सेवेकरी म्हणून आमच्या सर्वांसाठीच ही गोष्ट अत्यंत आनंद देणारी आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बाप्पाच्या रथाला बैलजोडी न लावता मंडळाचे कार्यकर्ते हा रथ ओढणार आहेत.
-पुनीत बालन (उत्सवप्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)