युवा जागतिक तिरंदाजी स्पर्धेत मुलींची बाजी

26 Aug 2025 13:58:56
 
 

yuva 
कॅनडातील विनीपेग येथे झालेल्या युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलींनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या स्पर्धेत प्रितिका प्रदीपने दाेन राैप्यपदके, गाथा खडके आणि शर्वरी शेंडे यांनी कांस्यपदक पटकावत महाराष्ट्राचा गाैरव वाढवला. विशेष म्हणजे गाथा आणि शर्वरी यांनी अमेरिकेच्या संघावर अचूक निशाणा साधत एकतर्फी विजय मिळवला. या यशाबद्दल क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव काेकाटे यांनी हे खेळाडू व त्यांच्या प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे. अचूक निशाणा साधून पदकावर काेरलेले भारताचे नाव हा देशवासीयांसाठी व महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. हे यश अथक परिश्रम, मेहनत, संयम व जिद्दीचे मूर्तिमंत उदाहरण आहे. खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन कटिबद्ध आहे. राज्य शासन या खेळाडूंना सर्वाेताेपरी सहकार्य करणार असल्याचे काेकाटे यांनी नमूद केले आहे.
 
Powered By Sangraha 9.0