देशात काडेपेटीचा उद्याेग माेठ्या प्रमाणात वाढला

26 Aug 2025 14:11:22
 
 

thoughts 
 
भारतात 1914मध्ये फक्त 2160 लाख काडेपेटीच्या बाॅक्सची आवश्यकता हाेती. त्यावेळी काडेपेटी बाॅक्स जपान, स्वीडन सारख्या देशांकडून आयात करण्यात यायच्या.तत्कालीन भारत सरकारने 1921- 22मध्ये काडेपेट्यांच्या आयातीवर 200% एवढी भरभक्कम कस्टम ड्युटी लावली. त्यानंतर देशातील काडेपेटीचा उद्याेग भरभराटीला आला. भारतात सुरू झाला पहिला कारखाना भारतात काडेपेटी बनवण्याचा पहिला कारखाना अहमदाबादमध्ये सुरू झाला हाेता. त्यानंतर काेलकाता, मद्रास, बरेली आणि दुसऱ्या अनेक ठिकाणी काडेपेटीचे कारखाने सुरू झाले.द. भारतात काडेपेट्यांचा उद्याेग वाढला देशामध्ये सध्या काडेपेट्यांचे माेठे कारखाने आणि लहान-माेठ्या काॅटेज इंडस्ट्रीज या दक्षिण भारतामध्ये आणि विशषेतः तमिळनाडूमध्ये जास्त आहेततमिळनाडूमधील शिवकाशी, विरुधुनगर, गुडियाथम आणि तिरुनेलवेली ही काडेपेटीची मुख्य उत्पादन केंद्रे आहेत.
 
कर्नाटकात बंगळुरु, म्हैसूर, धारवाड आणि इतर भागांमध्ये लहान-माेठ्या कंपन्या काडेपेट्या बनवतात. आंध्र प्रदेशात गुंटूर, विजयवाडा आणि इतर भागांमध्ये काडेपेटीचे उत्पादन केले जाते.महिलांनी चालविलेला उद्याेग तमिळनाडूमध्ये सुमारे चार लाख लाेक या उद्याेगात काम करतात, असे सांगितले जाते. यातील 90 ट्न्नयांहून अधिक कर्मचारी महिला आहेत. कर्मचाऱ्यांना काडेपेटी बनवण्याच्या क्षमतेनुसार पैसे दिले जातात. त्यामुळे बहुतांश कामगारांचे उत्पन्न अत्यल्पच असते. गृहाेद्याेगाच्या स्वरूपातील व्यवसायांचे आधुनिकीकरण करण्याची गरज आहे.कारखान्यांमधून मशीनने सुरू झाले काम सध्या अनेक कारखान्यांमधून आधुनिक ऑटाेमॅटिक मशीन आल्या आहेत. तिथे काडेपेटी संपूर्णपणे मशीनवर बनते. बांबू (वांस), चील किंवा सिमळा लाकडापासून पद्धतशीर मापात काड्या कापण्यासाठी यंत्रे वापरण्यात येतात. त्यानंतर त्या काड्यांना एकसारख्या बनविले जाते.
 
काडीच्या टाेकावर जळत्या मसाल्याची टाेपी गाेंद किंवा पेस्टने लावली जाते, ही सगळी कामे मशीनने केली जातात. पुठ्यापासून लहान माचीसच्या आकाराचे बाॅक्स बनवण्याचे कामही यंत्रांवर केले जाते. त्या खाेक्यांच्या दाेन्ही बाजूंना जाळण्यास याेग्य असलेल्या मसाल्याचा लेप मशीनच्या सहायाने लावला जाेता. त्यानंतर काडेपेटीत काड्या माेजून भरणे आणि त्या काडेपेट्या खाेक्यात भरण्याचे काम मशीनने केले जाते.काडेपेटी या पदार्थांपासून बनते काडेपेटी तयार करण्यासाठी 14 प्रकारचा कच्चा माल वापरला जाताे. त्यामध्ये लाल फाॅस्फरस, मेण, कागद, स्प्लिंट्स, पाेटॅशियम क्लाेरेट आणि सल्फरचा प्रामुख्याने वापर केला जाताे.
Powered By Sangraha 9.0