आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पुढे जात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयाेग करून शेती, आराेग्य, शिक्षण आदी महत्त्वाच्या सुविधा सातनवरी गावात उपलब्ध करून देत समृद्ध गावाचे राेल माॅडेल उभे राहिले आहे. लवकरच प्रत्येक तालुक्यातील 10 गावे स्मार्ट व इंटेलिजेंट करण्यात येणार आहेत. याद्वारे पहिल्या टप्प्यात राज्यातील जवळपास 3500 गावे स्मार्ट व इंटेलिजेंट करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.केंद्रीय दूरसंचार मंत्रालयांतर्गत कार्यरत व्हाॅइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नाॅलाॅजी एंटरप्रायजेसने (व्हाॅईस) देशांतर्गत 24 कंपन्यांच्या संघटनांसाेबत एकत्र येत राज्य शासन व नागपूर जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने सातनवरी गावात आधुनिक तंत्रज्ञानाधारित सेवा उपलब्ध करून देत या गावाला देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजेंट गाव बनवले आहे.
प्रायाेगिक तत्त्वावर उभारण्यात आलेल्या सर्व आधुनिक सुविधा असलेल्या गावाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. नागपूरचे पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार चरणसिंह ठाकूर, सातनवरीच्या सरपंच वैशाली चाैधरी, जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी आदी यावेळी उपस्थित हाेते. सातनवरी गावाच्या शुभारंभामुळे देशात विकसित ग्रामीण भागासाठी डिजिटल गावाची सुरुवात झाल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. बर्वे, ठाकूर यांनीही मनाेगत व्य्नत केले.तत्पूर्वी व्हाॅइस कंपनीचे प्रमुख राकेश कुमार भटनागर यांनी ग्रामपंचायत कार्यालयात मुख्यमंत्र्यांना स्मार्ट व इंटेलिजेंट गाव उपक्रमांतर्गत सातनवरी गावातउपलब्ध करून देण्यात येत असलेल्या विविध साेयीसुविधांबाबत सादरीकरण केले.जिल्हा परिषदेच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या 40 अंगणवाड्यांचे ई-भूमिपूजन व 15व्या वित्त आयाेगातून प्राथमिक आराेग्यवर्धिनी उपकेंद्रात बसवलेल्या साैरपॅनेलचे ऑनलाइन लाेकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.