काेणत्याही शिक्षणाचे, संशाेधनाचे अंतिम ध्येय लाेककल्याणासह विकासाला गती आणि देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक महत्त्वपूर्ण असते. बदलत्या तंत्रज्ञानाच्या व कृत्रिम गुणवत्तेच्या या काळात देशाला अधिक सुरक्षित आणि सक्षम करायचे असेल तर युवकांनी आपल्या संशाेधनाची व्याप्ती वाढवावी, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी केले.
राष्ट्रीय सुरक्षेसाठी तरुणांची भूमिका आणि विकास या विषयावर सर विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॅालॅाजीत (व्हीएनआयटी) राष्ट्रीय परिषदेत ब्रिजेश सिंह बाेलत हाेते. ही परिषद यूथ फाॅर नेशन यांच्या विद्यमाने आयाेजिण्यात आली हाेती. यावेळी ले. ज. व्ही. के. चतुर्वेदी, पत्रकार सरिता काैशिक, प्रा. याेगेश देशपांडे उपस्थित हाेते.
देशातील शैक्षणिक सुविधा भ्नकम हाेत असताना या शैक्षणिक संस्थांमधून, विद्यापीठांमधून जे संशाेधन हाेत आहे, जे पेटंट आपण मिळवत आहाेत त्या पेटंटमध्ये आजच्या काळाशी साधर्म्य साधणारे आहे का, हा प्रश्न आहे. विकास प्रक्रियेला सर्वार्थाने सक्षम करण्यासाठी लाेकहित, देशाची सुरक्षितता, सुरक्षित माहिती तंत्रज्ञान या बाबींवर युवकांनी अधिक भर द्यावा, असे आवाहन ब्रिजेश सिंह यांनी केले.सीमाप्रश्न व शेजारील देशाकडून हाेणारी घुसखाेरी अनेक वर्षांपासून हाेत असल्याचे आपल्या निदर्शनास येते. भारतासारख्या देशाला राेखण्यासाठी अनेक देशांतील घटक अडथळे निर्माण करतात. ही घुसखाेरी राेखण्यासाठी सैन्यबळासह तंत्रज्ञानाचे बळ अधिक माेठ्या प्रमाणात आपल्याला कसे उभे करता येईल, यावर प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे ले. ज. चतुर्वेदी यांनी सांगितले.