अपचनाची तक्रार दूर कशी कराल?

    26-Aug-2025
Total Views |
 

Health 
 
आपणास कित्येक वेळा अपचनाच्या तक्रारीला सामाेरे जावे लागते. अपचन ही जणू आधुनिक जीवनशैलीची भेट आहे. अनियमित खानपान, व्यायामाचा अभाव.भाेजनाच्या चुकीच्या सवयी यांनी अपचनाच्या तक्रारीला बळ मिळत आहे. अपचन राेखण्यासाठी खालील उपायांवर ध्यान द्यावे.हळूहळू खावे आणि भाेजन चांगल्या प्रकारे चावून घ्यावे.रिलॅ्नस हाेऊन भाेजन घ्यावे.भाेजन घेताना घाई करू नये.घाईने भाेजन घेण्याने पचनक्रिया बिघडते. दरराेज 2-10 ग्लास पाणी प्यावे. सॅलड, फळे आणि भाज्या यांचे सेवन करावे. कारण यात पाणी आणि फायबर दाेन्ही असतात. अधिक काेल्डड्रिंक घेऊ नये. कारण याने गॅसेस बनतात.नियमित वेळेवर भाेजन घ्यावे आणि भाेजनानंतर कमीत-कमी अर्धा तास आराम करावा. रात्री जडान्न घेवू नये. हलके, सुपाच्च भाेजन झाेपायच्या वेळेच्या दाेन तास अगाेदर घ्यावे. मसालेदार भाेजन घेऊ नये. भाेजनानंतर व्यायाम करू नये.