घराचा हाॅल सजवण्यासाठी काही युक्त्या

    26-Aug-2025
Total Views |
 
 
hall
 
लिव्हिंग रूममध्ये फर्निचर नक्की कसे ठेवायचे हा प्रश्न सर्वांनाच पडताे. बऱ्याचदा बऱ्याच घरात आपण पाहताे की एखाद्या भिंतीजवळ साेफा ठेवलेला असताे आणि त्याला जाेडून एक दाेन खुर्च्याही असतात. पण फर्निचर व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्हाला नक्कीच थाेडं डाेकं चालवायला लागेल.तुम्ही कमीत कमी जागा व्यापून फर्निचर बनवण्याची गरज आहे. साेफा कम बेड एका ठिकाणी ठेवून एखाद्या भिंतीत छानसा शेल्फदेखील तुम्ही बनवून घेऊ शकता. ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती पुस्तकं आणि शाे पिस ठेवून लिव्हिंग रूमला वेगळा लुक देऊ शकता.बऱ्याचदा लिव्हिंग रूममधील लादी ही आपल्या लिव्हिंग रूमची शाेभा घालवत असते. मग अशावेळी तुम्ही एरिया रग्ज अर्थात कारपेट अथवा कापडाच्या वेगवेगळ्या डिझाईन्सच्या रग्सचा वापर करू शकता. तुमच्या लिव्हिंग रूमच्या रंगाप्रमाणे तुम्ही याची निवड करा.
 
घरात तुम्हाला कलाकुसर करायला बऱ्याच ठिकाणी वाव असताे. तुमच्या घरातील भिंतीवर तुम्ही अर्थातच फ्रेममधील फाेटाे लावू शकता. पण त्याचप्रमाणे तुम्हनैसर्गिक शाे पिस ठेवल्यासदेखील लिव्हिंग रूमची शाेभा वाढते. तुम्ही तुमच्या अथवा तुमच्या कुटुंबाच्या अनेक फाेटाेंनी रंगसंगती करून तुमच्या घरातील एका भिंतीवर फ्रेम्स करून त्यावर एक लहान लाईट्स साेडू शकता. हे दिसायला अप्रतिम दिसतं. टेबलवरील काेस्टर्स, फ्लाॅवरपाॅट्स, पायपुसणी यासारख्या लहानसहान गाेष्टींनी कलात्मकतेचा संपूर्ण अनुभव निर्माण करता येताे.लिव्हिंग रूममध्ये नेहमीच सूर्यप्रकाश जास्त येणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या लिव्हिंग रूमच्या खिडक्या तुम्ही माेठ्या ठेवणं आवश्यक आहे.
 
तसंच लिव्हिंग रूममध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं लायटिंग करू शकता. रात्रीच्या वेळी तुम्हाला संधीप्रकाश हवा असल्यास, पिवळ्या रंगाचे लहान एईडी लावून घ्या.तसंच काही पांढरे एलईडीदेखील तुम्ही लावून घ्या. एखाद्या ठिकाणी लिव्हिंग रूममध्ये शँडिलिअर लावल्यास, त्याची सुंदरता अधिक उठून दिसते. त्यामुळे त्यासाठीदेखील खास जागा नक्की ठेवून द्या.तुमच्या घराला ऑफव्हाईट रंगही चांगला दिसताे. पण लिव्हिंग रूमला तुम्हाला वेगळा रंग द्यायचा असेल तर ती तुमची निवड असेल. पण त्यातही तुम्ही तीन भिंती फिक्या ठेवून एका भिंतीवर ताेच गडद रंग दिलात तर तुमची लिव्हिंग रूम अधिक छान दिसते. तसंच या भिंतीवर तुम्ही तुमच्या आवडत्या फ्रेम लावल्यात तर तुम्हाला लिव्हिंग रूमच्या भिंतीचा रंग अधिक आकर्षक दिसेल.