गणेशाेत्सवासाठी काेकणात जाणाऱ्या भाविकांना वाहतुकीतील अडथळ्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी नवी मुंबई पाेलिसांनी विशेष वाहतूक आराखडा तयार केला आहे. 26 ऑगस्टपर्यंत शीवपनवेल महामार्गासह नवी मुंबईतील इतर महामार्गांवर हे नियाेजन राबवले जाईल. टाेलमाफीपासून मदत केंद्रांपर्यंत सर्व साेयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. काेकणात जाणाऱ्या गणेशभ्नतांना नवी मुंबईतील काेणत्याच महामार्गावर अडथळ्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्याची सूचना नवी मुंबईचे पाेलीस आयु्नत मिलिंद भारंबे यांनी वाहतूक पाेलीस विभागाला दिल्या हाेत्या.
या सूचनेनंतर वाहतूक विभागाचे उपायु्नत तिरुपती काकडे यांनी गणेशाेत्सवासाठी खास वाहतूक आराखड्याचे नियाेजन केले. या आराखड्याबाबत अंतिम आढावा घेण्यासाठी बेलापूर पाेलीस विभागात बैठक झाली. या बैठकीला उपायु्नत काकडे यांच्यासह सहायक उपायु्नत विजय चाैधरी आणि 14 वाहतूक पाेलीस ठाण्यांचे सर्व वरिष्ठ निरीक्षक उपस्थित हाेते. या आराखड्यानुसार उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 62 पाेलीस अधिकारी आणि 700 कर्मचारी रस्त्यांवर वाहतुकीचे नियमन करणार आहेत. काेकणात जाणाऱ्या वाहनांची गर्दी ध्यानात घेऊन पाेलिसांनी नियाेजन केले आहे. गणेशभ्नतांचा प्रवास निर्विघ्न आणि सुरक्षित व्हावा, यासाठी नवी मुंबई वाहतूक विभाग सज्ज असल्याचे पाेलिसांनी स्पष्ट केले.