मोहननगर परिसरात वारंवार वीज खंडित

26 Aug 2025 14:38:27
 
moh
 
पिंपरी, 25 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
मोहननगर परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. याविरोधात नागरी हक्क कृती समितीच्या वतीने महावितरणच्या भोसरी विभागीय कार्यालयात निवेदन देण्यात आले. महावितरणच्या गलथान आणि नियोजनशून्य कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली. मोहननगरमधील वीजप्रश्नाबाबत शिष्टमंडळाने भोसरीचे उपअभियंता एस. एस. क्षीरसागर यांना निवेदन दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, संजय जगताप, माधव निर्लेकर, महेश पंडित आदी उपस्थित होते.
 
कार्यकारी अभियंता अतुल देवकर यांच्याशीही त्यांनी चर्चा झाली. मोहननगरमधील विद्युत रोहित्रावर भार अधिक असल्यामुळे उच्चदाब वाहिनीवर ताण येतो. त्यामुळे वारंवार विजेच्या समस्या येत आहेत. मोहननगर परिसरात वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. विद्युत रोहित्राच्या जागेवर झाडेझुडपे आणि गवत वाढलेले आहे. हा परिसर भोसरी विभागाशी जोडल्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. लघुदाब वाहिनी (एलटी) व फीडर बॉक्स यांचा सर्व्हे करण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0