दीव हे अतिशय छाेटेसे पण सुंदर बेट आहे. या बेटाला पाेर्तुगिजांचा वारसा लाभलेला आहे. त्याबराेबरच या ठिकाणी अनेक निसर्ग सुंदर समुद्रकिनारे आहेत. दीव मधील प्रमुख आकर्षण म्हणजे तेथील किल्ला, नायडा केव्हज आणि सेंट पाॅल्स चर्च, जेव्हा तुम्ही या ठिकाणी याल तेव्हा नागाेआ बीचला आणि घाेगला बीचला भेट देण्यास विसरू नका. पर्यटक या ठिकाणी जलक्रीडेचा आनंद देखील लुटतात.