विभागाच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच 331 सहायक माेटार वाहन निरीक्षकांना माेटार वाहन निरीक्षक पदावर पदाेन्नती देण्यात आली आहे.पदाेन्नतीने अधिकारांबराेबरच जबाबदारीत वाढ झाली आहे. अधिकाऱ्यांनी राज्यात रस्ता सुरक्षा वाढवून अपघाती मृत्यू राेखण्यावर भर देण्याचे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.माेटार वाहन निरीक्षकपदी पदाेन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांचा पदभार समारंभ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात झाला. परिवहन आयु्नत विवेक भीमनवार, अतिर्नित परिवहन आयु्नत भरत कळसकर, सहआयु्नत संजय मेहेंत्रेवार, जयंत पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण, विनाेद सागवे आदी यावेळी उपस्थित हाेते.राज्यातील रस्ते अपघात राेखण्यासाठी गतिराेधकमु्नत यंत्रणा विकसित करावी; तसेच एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्याबराेबरच अपघात प्रतिबंधात्मक उपाययाेजना कराव्यात. रस्त्यांवर दिशादर्शक फलकांची संख्या वाढवावी.
अपघात हाेऊच नये अशी व्यवस्था निर्माण करावी. अधिकाऱ्यांनी विभागाची प्रतिमा नेहमी उज्ज्वल ठेवण्याची दक्षता बाळगावी, असे आवाहन सरनाईक यांनी केले.वाहनसंख्या, तंत्रज्ञान वाढत आहे. परिवहन विभागाच्या सेवांची तुलना अन्य प्रगत देशांतील सेवांशी हाेत आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर असलेल्या सेवांची नागरिकांना अपेक्षा आहे. या अपेक्षापूर्तीसह अपघातांची संख्या राेखण्याचे आव्हान विभागासमाेर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने अपघात राेखण्यावर भर देण्यात येत आहे.देशातील सर्वांत माेठी आयटीएमएस (इंटरनेटेड ट्रान्सपाेर्ट मॅनेजमेंट सिस्टीम) प्रणाली विकसित करत असल्याचे भीमनवार यांनी सांगितले.प्रातिनिधिक स्वरूपात 8 अधिकाऱ्यांना पदभार देण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांना शपथ देण्यात आली.