आपण नेहमी अंथरूण पाहून पाय पसरावेत

    25-Aug-2025
Total Views |
 

thoughts 
अनालाे्नयं व्ययं कर्ता ह्मनाथ: कलहप्रिय:। अतुर सर्वक्षेत्रेपु नर: शीर्घ विनश्चयति।। आज समाजात आर्थिक तणावांमुळे माणसाची मानसिकता अत्यंत विकृत झाली आहे. लाेक इतरांच्या घरांमध्ये टीव्ही, फ्रीज, कार व इतर साधने पाहून स्वत:कडे ते मिळवण्याचा माेह बाळगतात. पण, आपल्या उत्पन्नाची स्थिती त्यांच्या लक्षात येताच ते निराश हाेतात. यामुळे काेठून तरी कर्ज काढून ते उपभाेगाच्या वस्तू जमवून आपल्या कुटुंबातील लाेकांकडून प्रशंसा मिळवतात. परंतु, नंतर जेव्हा कर्ज व व्याज फेडण्याची वेळ येते तेव्हा उत्पन्नाच्या साधनांची मर्यादा त्यांच्यासाठी संकटाचे कारण हाेते.अनेकजण तर यामुळे नाश पावतात.कारण त्यांना घेणेदार सतावतात वा धमकी देतात.
 
याशिवाय काहीजण लबाडी व फसवणुकीचा मार्ग अवलंबून घातक मार्गावर चालू लागतात. ज्याचे दुष्परिणाम त्यांना नंतर भाेगावे लागतात.अशा प्रकारे आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करणारेच संकटात सापडल्यामुळे स्वत:चे जीवन गमावून बसतात. समजूतदार व हुशार व्य्नती तीच असते जी आपल्या उत्पन्नानुसार खर्च करते. कमाईपेक्षा जास्त खर्च करणे नेहमीच दु:खाचे मूळ कारण असते.ही स्थिती त्या लाेकांचीही असते जे राेज इतरांशी भांडण व वाद करीत असतात. यामुळे त्यांच्या शरीरात उच्च रक्तदाब व हृदयराेगासंबंधित विकार आपले घर करून घेतात. शेवटी शांतपणे आपले काम करीत राहण्याचाच प्रयत्न करायला हवा. स्वत:वर श्नय तेवढे नियंत्रण ठेवावे.नीतिज्ञ चाण्नय म्हणतात की, अविचाराने आपल्या उत्पन्नाच्या साधनांपेक्षा जास्त खर्च करणाऱ्या, सहायकरहित, युद्धात रुची घेणारा व कामुक माणसाचा लवकरच नाश हाेताे.