आकाशवाणीवर डॉ. नामदेव भोसले यांची मुलाखत

25 Aug 2025 14:09:38
 
 dil
 
मुंबई, 24 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास आणि जय महाराष्ट्र कार्यक्रमात ‌‘अभिजात मराठी-माझ्या अपेक्षा‌’ या विषयावर होणाऱ्या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेच्या अनुषंगाने मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉ. नामदेव भोसले यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमात ही मुलाखत सोमवार (25), मंगळवार (26) आणि बुधवारी (27 ऑगस्ट) सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर; तसेच न्यूज ऑन आयआर या मोबाइल ॲपवर ऐकता येईल.
 
जय महाराष्ट्र कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवारी (26 ऑगस्ट) दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर रात्री 8 वाजता प्रसारित होईल. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत फेसबुक, एक्स आणि यूट्यूब या माध्यमांवरही ही मुलाखत पाहता येईल. ही मुलाखत कक्ष अधिकारी वासंती काळे यांनी घेतली आहे. केंद्राने 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला. ही घटना सर्व मराठी बांधवांसाठी अभिमानाची असून, त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
Powered By Sangraha 9.0