लोकमान्य मल्टिपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटीने आणि लोकमान्य कल्चरल फाउंडेशन यांच्यामार्फत अच्युत गोडबोले अमृतसिद्धी सोहळा

25 Aug 2025 14:33:31
 
 lok
 
15 ऑगस्ट 2025 या दिवशी प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले 75 वर्षांचे झाले. आजवर विविध विषयांवर त्यांची जवळपास 65 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. अच्युतजींच्या पंचाहत्तरी निमित्त सोहळा आयोजित केला होता. लोकमान्य मल्टिपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटीने आणि लोकमान्य कल्चरल फाउंडेशन यांनी अमृतसिद्धी सोहळा संध्याकाळी 5.30 वाजता पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूटमधल्या काळे सभागृहात हा सोहळा पार पडला.
 
या प्रसंगी अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर आणि सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ, लेखक, नाटककार आणि वक्ता डॉ. आनंद नाडकर्णी हे प्रमुख अतिथी उपस्थित होते. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. या प्रसंगी उदयोन्मुख कलाकार मेहेर परळेकर आणि स्वयंसेवी संस्थेच्या जयश्री काळे, जागृती सेवा संस्था यांना पुरस्कार दिला गेला. या वेळी काही पुस्तकांचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा काशीकर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार आभा औटी यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता भैरवी गायनाने झाली.
Powered By Sangraha 9.0