आकाशवाणीवर रूपाली चाकणकर यांची मुलाखत

23 Aug 2025 16:21:54
 
आकाशवाणी
 
मुंबई, 22 ऑगस्ट (आ.प्र.) : महिलांच्या सश्नतीकरणासाठी आणि त्यांच्या ह्नकांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य महिला आयाेग सातत्याने कार्यरत आहे. मुंबईत राष्ट्रीय पातळीवरील क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयाेजन करण्यात आले असून, या विषयाच्या अनुषंगाने राज्य महिला आयाेगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास आणि जय महाराष्ट्र कार्यक्रमात प्रसारित हाेणार आहे. दिलखुलास कार्यक्रमात ही मुलाखत शनिवारी (23 ऑगस्ट) सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच न्यूज ऑन आयआर या माेबाइल अ‍ॅपवर ऐकता येईल. निवेदक दीपक वेलणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयाेग आणि महाराष्ट्र महिला आयाेगाच्या विद्यमाने मुंबईत दाेनदिवसीय क्षमता बांधणी कार्यशाळा आयाेजिण्यात आली आहे. या कार्यशाळेत देशभरातील महिला आयाेगांच्या अध्यक्षा व सदस्य सहभागी हाेणार असून, महिलाविषयक कायद्यांची परिणामकारक अंमलबजावणी, महिलांच्या सामाजिक प्रश्नांवर उपाययाेजना आणि देशव्यापी कृती आराखडा तयार करणे या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा हाेणार आहे.
Powered By Sangraha 9.0