(भाग 1)
अनेकजण डाॅ्नटरांचा सल्ला न घेता स्वत:च औषधे घेऊ लागले आहेत. त्यांना वाटत असते की, सर्दीपडशासारख्या किरकाेळ आजारांवर उपचार आपण स्वत:च करू शकताे. पण अशा प्रकारे स्वत: औषधे घेतल्यास अनपेक्षित साइड इफे्नट्स हाेऊ शकतात.
भारतात केलेल्या अनेक अध्ययनांतून असे दिसून आले आहे की, शहरी भागात 37 % लाेक डाॅ्नटरांचा सल्ला न घेता औषधे घेत आहेत. याचा एक गंभीर परिणाम अँटीबायाेटिक रेजिस्टेंसच्या रुपात समाेर आला आहे. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेद्वारा केल्या गेलेल्या एका स्टडीच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार अँटीबायाेटिक औषधांच्या बेसुमार व अनावश्यक वापरामुळे सुमारे 50% लाेक त्या मजबूत अँटीयायाेट्निसवर परिणाम आता दाखवत नाहीत जे सामान्यत: हाॅस्पिटलमध्ये हाेणाऱ्या संक्रमणांच्या उपचारात दिले जातात. आज जाणून घेऊ या याविषयी...
स्वत: औषधे घेत असाल तर हे दुष्परिणाम जाणून घ्या जेव्हा एखादा चुकीच्या पद्धतीने औषधे घेताे तेव्हा ताे या साइड इफे्नट्सचा शिकार हाेऊ शकताे.
उदाहरणार्थ पेन किलर्सचा जास्त वापर किडनीवर दुष्परिणाम करू शकताे. चुकीच्या अँटीबायाेटिकच्या वापरामुळे इन्फे्नशन अधिक जास्त वाढू शकते. झाेपेच्या गाेळ्या वा स्टेराॅइडच्या दुरुपयाेगामुळे गंभीर समस्या हाेऊ शकतात.
अँटीबायाेटिक रेजिस्टेंस...
रुग्णांसाठी रेड अलर्ट अँटीबायाेटिक रेजिस्टेंस तेव्हा हाेत असते जेव्हा बॅ्नटेरिया अँटीबायाेटिक औषधे परिणाम करणे बंद करतात. ही समस्या चुकीच्या पद्धतीने आणि गरजेपेक्षा जास्त अँटीबायाेटिक घेतल्यामुळे वाढत आहे. हाॅस्पिटलमध्ये भरती पेशंट्सना असे इन्फे्नशन हाेऊ शकते. ज्यामुळे जीवनशैलीवर गंभीर परिणाम हाेतात. सेल्फ मेडिटेशनमुळे गंभीर आजार कळून येत नाहीत जेव्हा एखादा डाॅ्नटरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेताे तेव्हा ताे फक्त लक्षणे दाबत असताे. यामुळे खरा आजार कळायला वेळ लागताे आणि एखादा गंभीर आजार सुरुवातीलाच कळत नाही.
(क्रमश:)