विकास प्रकल्पांना चालना देण्याची गाेरे यांची मागणी

23 Aug 2025 16:17:39
 
विकास प्रकल्प
 
नवी दिल्ली, 22 ऑगस्ट (आ.प्र.) : पंचायतराज व ग्रामविकास मंत्री आणि साेलापूरचे पालक मंत्री जयकुमार गाेरे दिल्ली दाैऱ्यावर असून, त्यांनी साेलापूर आणि सातारा जिल्ह्याच्या महत्त्वपूर्ण विषयांसंदर्भात विविध केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन चर्चा केली. गाेरे यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.
 
जिल्ह्यातील पालखी मार्गामधील अडथळे दूर करावेत; तसेच फलटण-पुणे हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा, अशी विनंती गाेरे यांनी केली. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, काेरेगाव आणि सातारा तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना सिंचन सुविधा पुरवण्यासाठी जिहे-कठापूर उपसा सिंचन याेजनेच्या टप्पा-2च्या विस्ताराला गती देण्याच्या उद्देशाने केंद्रीय जल आयाेगाचे अध्यक्ष अतुल जैन यांची गाेरे यांनी सेवा भवनात भेट घेतली. या वेळी त्यांनी तांत्रिक सल्लागार समिती मंजुरीसाठी औपचारिक निवेदन सादर केले. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चाैहान यांची भेट घेऊन प्रधानमंत्री ग्राम सडक याेजना टप्पा-4च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गाेरे यानी निवेदन सादर केल
Powered By Sangraha 9.0