गडचिराेलीत गिफ्टमिल्कचा प्रयाेग यशस्वी ठरला

23 Aug 2025 16:13:05
 
गडचिराेली
 
गडचिराेली, 22 ऑगस्ट (आ.प्र) : गडचिराेली जिल्ह्यातील हजाराे मुलांना राेज मिळणाऱ्या पाैष्टिक दुधामुळे त्यांचे आराेग्य व आयुष्य सकारात्मक दिशेने बदलत आहे. मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राबवण्यात येणाऱ्या ‘गिफ्टमिल्क’ उपक्रमामुळे कुपाेषणाशी लढा साेपा झाला असून, शालेय विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बाैद्धिक आणि भावनिक विकासाला चालना मिळाली आहे. हा उपक्रम माझगाव डाॅक लिमिटेडने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीतून राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या फाऊंडेशन फाॅर न्यूट्रिशनच्या माध्यमातून हाती घेतला आहे. गरीब व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना राेज 200 मिली फ्लेव्हरयु्नत दूध दिले जात असून, 5 ते 15 वर्षे वयाेगटातील विद्यार्थ्यांमध्ये कुपाेषण कमी करण्याबराेबरच शाळेत हजेरी वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
 
मागील वर्षी धानाेरा, कुरखेडा, देसाईगंज व काेरची तालुक्यातील 472 शासकीय व जिल्हा परिषदेच्या शाळांत हा उपक्रम राबवण्यात आला. यातून पहिली ते पाचवीच्या 16618 व सहावी ते आठवीच्या 4170 अशा एकूण 20888 विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळाला. या वर्षी हा उपक्रम आरमाेरी तालुक्यातील 124 शाळांत राबवण्यात येत असून, सप्टेंबरपासून 9337 विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. शालेय प्रशासन व पालकांच्या मते, या याेजनेमुळे मुलांचे आराेग्य सुधारले असून, शाळेत नियमित उपस्थिती वाढली आहे. मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाचे काैतुक करत भविष्यात गडचिराेली जिल्ह्यात व्यापक स्वरूपात हा उपक्रम राबवण्याचा मानस व्य्नत केला आहे.
Powered By Sangraha 9.0