आजार टाळण्यासाठी पावसात भिजू नका

    23-Aug-2025
Total Views |
 
पावसात भिजू नका
 
पावसाळा सुरू हाेताच माेसमी आजारही दार ठाेठावू लागतात.पावसात भिजल्यामुळे सर्दी, खाेकला व किंचित तापाच्या केसेस येत आहेत. तेच मलेरिया, कावीळ व गॅस्ट्राेएंट्राइटिसनेही लाेक ग्रस्त हाेत आहेत. व्हायरल आणि टायाइडमध्ये लक्षणे एकसारखी असतात. (भाग 1)
 
टायाइड वाढल्यास उलट्या हाेण्यास सुरुवात हाेते. तेच काविळीच्या केसेसमध्ये ीव्हर येताे व भूक बंद हाेते. यासाठी ताप आल्यानंतर उपचारात बेपर्वाई करू नये. लक्षणे दिसताच डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. तशा आता काेव्हिडच्या केसेस कमी आहेत. पण काेव्हिड व नाॅन काेव्हिडचे डायग्नाेस करून उपचार सुरू करायला हवेत. पावसाळ्यात भिजल्यास वा इतर कारणाने पडसे सुरू हाेते. ते दाेन ते दिवसात बरे हाेत नसेल व ताप येत असेल तर काेव्हिडची तपासणी करवून घ्यावी. सर्दी व ताप येत असेल तर ते मलेरियाचे लक्षण आहे. दुसरीकडे थंडी न वाजता गार जाणवत ताप येत असेल, हात-पाय दुखत असतील तर हा काेव्हिड असू शकताे.
 
प्राथमिक स्टेजमध्ये उपचार सुरू केल्यास माइल्ड माॅडरेट काेव्हिडमध्ये बदलण्यापासून राेखता येऊ शकते. सर्दी-खाेकला झालेल्या व्यक्तीपासून दूर राहावे. बचावासाठी एसीत राहू नये. तसेच थंड पेयेही पिऊ नयेत. एसीत राहिल्यामुळे घसा दुखणे व ताप येऊ शकताे. पावसाळा आणि किमान तापमानात काेव्हिड वाढण्याचे चान्स असतात.
मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा.
 
मालिश केल्यामुळे थांबेल केसगळती : या सीझनमध्ये केस रेस्टिंग ेजमध्ये पाेहाेचतात. यामुळे त्यांचे गळणे सुरू हाेते. आजकाल क्राॅनिक हेअर ाॅल जास्त हाेत आहे. गुंत्यात केस तुटत आहेत. स्कल्पवर ंगल इन्ेक्शन, डँड्रफ, पुरळ व खपली धरण्याची समस्या वाढते.
 
पावसाळ्यात आर्द्रता व घाम आल्यामुळे ंगस येऊ शकतात. वेळीच उपचार न घेतल्यास हे रेजिस्टेन्स हाेतात. नंतर याचा दीर्घकाळपर्यंत उपचार घ्यावा लागताे. या माेसमात गाजर गवताने अ‍ॅलर्जी, सिमेंट व हाऊसवाइफ डर्मेटायटिस हाेत आहे. तेच लाल चट्टेही पाहायला मिळत आहेत.
 
बेसन, पनीर, नट्स व पेस्टिसाइडनेही चट्टे हाेऊ शकतात. गल इन्क्शन झाल्यास साबण वापरू नये. हेअराॅल टाळण्यासाठी मालिश करावी. याशिवाय मिनरल्स व प्राेटीनचे प्रमाण डाएटमध्ये वाढवावे.
 
(क्रमश:)