आत्महत्या हे कुठल्याच समस्येवरील उत्तर नसते. परिस्थितीशी झगडणे, संघर्ष करणे यातूनच उत्तरे सापडत जातात.
शिक्षण ही सगळ्यात माेठी संपत्ती आहे.त्याचा आदर करा.
जेव्हा तुमच्याकडे पर्याय नसताे तेव्हा पराभव मान्य करा आणि नव्या वाटेने मार्गस्थ व्हा. महान याेद्ध्यांसाठी जीवन कधीच साेपे नसते. जीवन साेपे नसल्यामुळेच आपली नेमकी पात्रता आपल्याला कळते.
आपला सगळ्यात चांगला मित्र म्हणजे स्व-प्रतिष्ठा तुम्हीदेखील कधी तरी चुकू शकतात.
चुकण्यात काहीही गैर नाही. चूक मान्य करा, दुरुस्त करा. अंहकारातून चुकीचे समर्थन करू नका किंवा त्याची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न करू नका.
दुर्दैव तुमच्याकडून सारे काही हिरावून घेऊ शकते. परंतु तुमची ताकद आणि लढण्याची जिद्द हिरावून घेतली जाऊ शकत नाही.
तुमच्यावर कुणी प्रेम करत नाही म्हणून काहीही बिघडत नाही. तुम्हांला स्वतः वर प्रेम करता यायला पाहिजे. ते सगळ्यात महत्त्वाचे आहे.
तुमचे दिसणे, त्वचेचा रंग, उंची, वजन ही तुमची ओळख असते. त्यातून तुमची वैशिष्ट्ये दिसतात. त्याचा आदर करा. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन लाेक तुमच्या गुणांचा आदर करतील असे स्वतःचे व्यक्तिमत्व घडवा.
आयुष्यात सगळे काही गमावले तरी चालेल फक्त कधीही आशा गमावू नका.
आशेवर सगळे जग चालत आले आहे आणि चालणार आहे.
जाेपर्यंत तुम्ही श्वास घेत आहात ताेपर्यंत तुम्ही नव्याने सुरु करू शकता.
कुणीतरी तुमचा विश्वासघात केला.
त्यांच्याकडे नैतिकता नाही. त्यासाठी स्वतःला शिक्षा करू नका.
जाेपर्यंत तुमची नव्या गाेष्टी शिकण्याची तयारी असते ताेपर्यंत तुमची वाढ थांबत नसते.
जर तुम्ही नेहमीच से्नस आणि त्याबाबत विचार करत असाल तर तुमच्याकडे माेकळा वेळ खूप आहे. ताे सत्काराणी लावा.
छंद आपल्या जगण्याचा कणा म्हणून काम करत असतात. ते तुम्हांला जगण्याची प्रेरणा देत असतात. त्यामुळे छंद जाेपासा.