तुमच्या कुटुंबाचे आराेग्य सुरक्षित राखण्याचा सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे वाॅटर िफल्टर. पाणी स्वच्छ आणि चवदार मिळावे म्हणून वाॅटर िफल्टरचा उपयाेग हाेताे. मग आता तुमचे प्राधान्य आणि गरज भागवणारा वाॅटर िफल्टर बाजारातून कसा निवडणार, हे महत्त्वाचे ठरते.
यासंदर्भातील माहिती वाॅटर फल्टरमुळे पाण्यातील क्लाेरीन आणि अन्य रसायने अगदी शिशासारखी न जाणावणारी रसायनेदेखील गाळून पाणी आपल्या ग्लासमध्ये पडते. त्यामुळे पाण्याची चव चांगली लागते.
घरातील सगळ्या पाण्याच्या वापरासाठी िफल्टर वापरणार असाल तर पिण्याबराेबरच, स्वयंपाक, आंघाेळ यासाठीदेखील स्वच्छ पाणी मिळू शकते. आंघाेळीचे पाणी क्लाेरीनयुक्त असेल तर त्याचा त्वचेवर परिणाम हाेताे. त्वचा खरखरीत हाेते किंवा काेरडी पडते.
घरातील ज्येष्ठ आणि मुलांची प्रतिकारशक्ती काहीशी कमजाेर असते. वाॅटर िफल्टरच्या वापरामुळे त्यांना बॅक्टेरिया, किटाणू नसलेले पाणी मिळते.
दूषित स्राेतांमधून येणाऱ्या पाण्यात सुमारे दाेन हजार प्रकारचे विषारी घटक असू शकतात. जेव्हा तुम्ही वाॅटर िफल्टर वापरता तेव्हा हे घटक गाळून आलेले पाणी तुमच्या पाेटात जाते. बाजारात अनेक प्रकारचे िफल्टर उपलब्ध आहेत. त्यामध्ये कार्बन िफल्टर किंवा अॅक्टिव्ह कार्बन, अल्ट्राव्हायाेलेट लाईट स्टरलायझेशन यांचा समावेश हाेताे. तुमच्या गरजा आणि बजेट पाहून वाॅटर िफल्टर निवडता येतात. तुम्हांला फक्त पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी की सगळ्या वापरासाठी िफल्टर पाहिजे, हे प्रथम निश्चित करा आणि मग िफल्टर निवडा.